गर्भवती असताना तीन आजारापासून संरक्षण होत असताना, फक्त एकापासूनच का?

गर्भवती असताना, बऱ्याच महिलांना धर्नुवाताचे इंजेक्शन प्राप्त होते. परंतु आता तुम्ही आणि तुमच्या बाळाला 3 आजारापासून म्हणजेच धर्नुवात, घटसर्प आणि डांग्या खोकला यापासून संरक्षण मिळू शकते. सर्व तिन्ही एकत्रितपणे.

धर्नुवात हा चेतासंस्थेचा आजार आहे, घटसर्प हा घशाचा संसर्ग आहे जो श्वसनमार्ग रोखतो आणि डांग्या खोकला हा श्वसनमार्गाचा गंभीर आजार आहे जो 2 महिन्यापेक्षा लहान वयाच्या अर्भकांना रुग्णालयात भरती करावयास भाग पाडू शकतो.

अर्भके ही जन्माच्या वेळी या तीन आजारांपासून योग्यप्रकारे संरक्षित नसतात. गर्भवती असताना लसीकरण करण्याने मातेपासून नवजात बालकाला या सर्व आजारांपासून -धर्नुवात, घटसर्प आणि डांग्या खोकला पासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते.

आई होणाऱ्या सर्वजणींनी या 3-इन-1 लसीकरणाबद्दल अधिक जाणून घ्यावे

गर्भवती असताना या 3-इन-1 लसीकरणाचे फायदे कोणते आहेत?

नवजात बालके ही जन्माच्या वेळी डांग्या खोकल्यापासून पुरेशा प्रमाणात संरक्षित नसतात. लसीकरण खास करून डांग्या खोकल्याचे लसीकरण हे 6-8 आठवड्यानंतर सुरू होते ज्यामुळे त्या काळात आणि जन्माच्या वेळेच्या जटीलता किंवा आयुष्याच्या सुरूवातीच्या पहिल्या काही महिन्यामध्ये त्यांना डांग्या खोकल्याच्या आजाराचा धोका असतो. गर्भवती असताना लसीकरण करण्याने डांग्या खोकल्याच्या आजाराच्या विरोधातील संरक्षण मातांकडून नवजात बाळांना मिळते.

डांग्या खोकला म्हणजे काय?

डांग्या खोकला (ज्याला व्हुपिंग खोकला म्हणून देखील ओळखले जाते) हा अतिशय संसर्गन्य श्वसनाचा रोग आहे, जो अतिशय गंभीर असू शकतो, खास करून नवजात बालकांसाठी. नवजातांना असणाऱ्या सर्वात सर्वसामान्य लक्षणांमध्ये खोकला जो डांग्या खोकल्याशी संबंधित असतो किंवा नसतो, श्वासोच्छश्वास करण्य़ास अडचण येणे आणि अन्य काही लक्षणे असतात ज्यांचे निदान करणे अवघड जाऊ शकते.

माझ्या बाळाला डांग्या खोकला कसा होऊ शकतो?

डांग्या खोकला हा संसर्गित दवबिंदूच्या माध्यमातून हवेद्वारे पसरतो, त्यामुळे हा आजार असलेली व्यक्ती जवळपास असल्यास, ती खोकल्यास किंवा शिंकल्यास, सहजपणे इतर लोकांना संक्रमित होतो. नवजात बालकांसाठी माता या सर्वात मुख्य स्त्रोत आहेत. त्यांना मोठ्या भाऊ किंवा बहिणी, कुटुंबातीस अन्य सदस्य किंवा सुश्रुषा प्रदान करणारे ज्या माहिती देखील नसते की त्यांना आजार हा असू शकतो.

माझ्या बाळाला डांग्या खोकला झाल्यास काय होईल?

डांग्या खोकल्यामुळे बाळांमध्ये आणि 2 महिन्यापेक्षा कमी वय असलेल्या नवजात बालकांमध्ये गंभीर आणि काही वेळा जीवघेण्या जटीलता निर्माण होऊ शकतात. नवजात आणि लहान मुले ही अस्वस्थ आणि श्वास घेण्यास अडचण येत असल्यामुळे ती निळी पडण्यास सुरूवात होऊ शकते. अगदी लहान बालकाला खोकला असतो, जो लक्षात येत नाही, मात्र काही छोटे कालावधी असू शकतात जेव्हा ते श्वास घेणे थांबवते. डांग्या खोकला असलेल्या 2 महिन्यापेक्षा लहान नवजात बालकांपैकी 90% बालकांना रूग्णांलयामध्ये भरती करण्याची आवश्यकता असते.

3-इन-1 लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम आहेत काय?

उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारावर, गर्भवती असताना देण्यात येणारे 3-इन-1 लसीकरण अधिक चांगल्या प्रकाराने सहन केले जाते, असे दिसून आले आहे. सर्वात सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या दुष्परिणांमध्ये, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या वेदना, इंजेक्शन देण्यात आलेल्या जागी सुजणे आणि लालसरपणा यांचा समावेश आहे.

माझ्या नवजात बालकाला डांग्या खोकल्यापासून संरक्षित करण्याचे अन्य कोणते मार्ग आहेत?

नवजात बालकांना डांग्या खोकल्यापासून वाचवण्याच्या अनेक वेगवेगळ्या पध्दती आहेत ज्यामध्ये मातांचे, कुटुंबातील सदस्यांचे आणि जवळच्या व्यक्तींचे लसीकरण करणे याचा समावेश आहे. अधिक तपशीलासाठी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा.

गर्भवती असताना मी 3-इन-1 लसीकरण केव्हा प्राप्त करावे?

गर्भवती असताना 3-इन-1 लसीकरण प्राप्त करण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेण्याच्या अधिक तपशीलासाठी तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी कृपया संपर्क साधा.

3 इन 1 प्रतिज्ञा घ्या

शिर्षावर जा

References: ● WHO Position paper,Tetanus vaccines,Weekly epidemiological record, Feb 2017. ● Centers for Disease Control (CDC). Diphtheria. Symptoms.[accessed Oct 2019]; Available at : https://www.cdc.gov/diphtheria/about/symptoms.html ● Centers for Disease Control (CDC). Pertussis (Whooping Cough). Complications.[accessed Oct 2019]; Available at: https://www.cdc.gov/pertussis/about/complications.html

*The list of diseases mentioned here is as per the diseases featuring in the list of preventable diseases by IAP in their routine and catchup vaccination recommendations.
There could be diseases beyond the list which could affect the child. Please consult your pediatrician for more information.

Information appearing in this material is for general awareness only and does not constitute any medical advice. Please consult your physician for any question or concern you may have regarding your condition.
The doctor show in this material/ multimedia content is being used for illustrative purpose only and is a professional model.